“राऊतांना भXXXचा अर्थ कळतो का, माझ्या बायकोला आणि आईला जाऊन…”
मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात वाद पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस दोघांमधील वाद चिघळत चालल्याचं दिसत आहे. अशातच काल संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर शिवीची भाषा करत निशाणा साधला. राऊतांच्या या वक्तव्याविषयी अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. आता सोमय्या यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
जोडे मारण्याची भाषा दलालपासून भXXXची भाषा. राऊतांना भXXXचा अर्थ कळतो का, माझ्या बायकोला आणि आईला जाऊन विचार. माझी बायको मराठी आहे. माझी सून मराठी आहे, बागायतकर. त्यांना जाऊन विचारा. राऊत त्यांची चोरी, लबाडी उघड होतेय म्हणून अशी भाषा करतायत का, असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री यावर का बोलत नाहीत. कुणातही त्यावर बोलण्याची हिंमत नाही. मला एकदाच काय ते सर्व शिव्या देऊन टाका, रोज रोज मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या आईला शिव्या देऊ नका, असं म्हणत सोमय्या यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, 19 बंगल्यांचा घोटाळा उघडकीस आणल्यानं मला जोड्याने मारण्याची भाषा केली जाते. परंतु स्वतः मुख्यमंत्री 12 कोटी जनतेची फसवणूक करत आहे, त्याचं काय, असा सवाल सोमय्यांनी केलाय.
थोडक्यात बातम्या –
“मुख्यमंत्री केलं तेव्हा नारायण राणे काय धुतल्या तांदळाचे होते का?”
मोठी बातमी! नारायण राणेंच्या बंगल्यावर मुंबई पालिकेचं पथक रवाना
मोठी बातमी! मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका
Zaira Wasim : “हिजाब ही चाॅईस नसून ही एक जबाबदारी आहे”
…म्हणून साई पल्लवीने नाकारली होती कोट्यवधींच्या जाहिरातीची ऑफर!
Comments are closed.