मुलींनो केस कापू नका, जेवण बनवायला शिका; भाजपच्या आनंदीबेन यांचा सल्ला

नवी दिल्ली | मुलींनी केस कापू नयेत, तसंच त्यांनी जेवण बनवायला शिकावं, असा सल्ला मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मुलींना दिला आहे. राजगढच्या कस्तुरबा गर्ल्स हॉस्टेलमधील विद्यार्थीनींशी त्या बोलत होत्या.

फक्त लिहीता वाचता येणं पुरेसं नाही. मुलींना स्वयंपाकघरातील कामातही दक्ष असासला हवं. सासरी गेल्यावर डाळ बनवता आली नाही तर सासूशी जोरदार भांडण होईल, असं आनंदीबेन यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, डाळ बनवणं, भाज्या चिरणं, पीठ मळणं अशा गोष्टी जमल्या नाहीत तर सासरी निभाव लागणार नाही… यामुळे विद्यार्थिनींनी आपापसात हॉस्टेलमध्येच जेवण बनवणं शिकावं, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

-माझ्या पाठीवर मोदींची थाप पडलीय,आता बंधूच्याही पाठीवर पडेल-रामराजे

-भाजप- शिवसेनेची युती होणारच- नितीन गडकरी

-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारे ‘तारिक अन्वर’ नेमके कोण आहेत?

-राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकणारे तारिक अन्वर कोणत्या पक्षात जाणार?

-तारिक अन्वर यांनी ‘राष्ट्रवादी’ला का सोडचिठ्ठी दिली?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या