बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शास्त्रींचा उत्तराधिकारी म्हणून द्रविडचं नाव?; कोण असेल भारतीय संघाचा नवा कोच

मुंबई | भारत आणि न्युझीलंडमधील अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताला पराभूत करत कसोटी क्रिकेटचा पहिला विश्वचषक आपल्या नावावर करत इतिहास रचला. न्यूझीलंडने भारताला 8 गड्यांनी पराभूत केलं आहे. त्यानंतर भारतीय संघावर आणि प्रशिक्षकांवर टीका होताना दिसत आहे. त्यात आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कालावधी येत्या वर्षाच्या अखेरीस संपत आहे. हेड कोच या पदासाठी शास्त्रींचा उत्तराधिकारी म्हणून राहुल द्रविडचं नाव घेतलं जात आहे.

कसोटी क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषकात दारूण पराभव झाल्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंडसोबत कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर दुसरीकडे येत्या टी 20 विश्वचषकाच्या तयारीसाठी नवी युवा टीम तयार होत आहे. त्यासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात 13 जुलैपासून टी 20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी शिखर धवन याच्या खांद्यावर भारतीय संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि जगात ‘द वाॅल’ म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड भारताच्या B टीमचा कोच असणार आहे.

आगामी काळात राहुल द्रविडला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आपण पाहू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राहुल द्रविडला श्रीलंका दौऱ्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून पाठवण्यात आलं आहे, पण आगामी काळात रवी शास्त्रीच्या जागी द्रविडला प्रशिक्षक म्हणून पाहता येईल, हेच याचे संकेत आहेत, असं माजी भारतीय खेळाडू रितिंदरसिंग सोधीने म्हटलं आहे. भविष्यात भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली जाईल, तेव्हा निवड समितीपुढे राहुल द्रविड हेच एकमेव नाव असेल, असंही त्यानं म्हटलं आहे.

दरम्यान, राहुल द्रविड यापूर्वी 2015 ते 2019 या कालावधीमध्ये भारत A आणि अंडर-19 टीमचा कोच होता. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली शुभमन गिल, पृथ्वी शाॅ, कमलेश नागरकोट्टी यांसारखे खेळाडू तयार झाले आहेत. त्यामुळे राहुल द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपची रणनीती समोर येईल”

डेल्टा प्लस व्हेरिअंटबाबत WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी दिली ‘ही’ दिलासादायक माहिती

मराठा आरक्षणाच्या या 5 मुद्द्यांचा न्यायालयाने एकदाचा निकाल लावून टाकला, पण आता पुढे काय?

‘कोरोनाची तिसरी लाट आली तर…’; अजित पवारांचा इशारा

न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळल्यानंतर फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More