नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) आज तेवीसावा दिवस आहे. रशियाने (Russia) युक्रेनवरील (Ukraine) हल्ले अधिक तीव्र केले असून रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यात युक्रेन सैनिकांसह शेकडो सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. रशियाकडून होणारे मिसाईल हल्ले, बॉम्ब हल्ले यामुळे युक्रेनमधील शहरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले. त्यामुळे रशियाने भारताला जागतिक बाजारापेक्षा स्वस्तात क्रुड ऑईल (Cruide Oil) खरेदी करण्याची ऑफर देऊ केली होती. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारताने अखेर रशियाची ऑफर स्विकारली आहे. दोन बड्या सरकारी कंपन्यांनी रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी केली आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन व हिंदुस्थान पेट्रोलियमने रशियाकडून तब्बल 20 लाख बॅरेल क्रुड ऑईल विकत घेतलं आहे. हे क्रुड ऑईल थेट रशियाकडून खरेदी केले जात नाही. रशियन ऑईलचा साठा असलेल्या एजंटकडून या कच्च्या तेलाची खरेदी केली जाते. या व्यवहारामुळे भारताला हे बॅरल जागतिक बाजारापेक्षा 20 ते 24 डॉलरने स्वस्त पडले आहे.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देश रशियासोबत व्यवहार करायला कचरत आहेत. मात्र, भारताने रशियाच्या ऑफरचा स्विकार करत स्वस्तात सौदा केला आहे. रशियासोबत केलेल्या या व्यवहारामुळे भारतीय ऑईल कंपन्यांवरील दरवाढीचा दबाव कमी होणार आहे.
थोडक्यात बातम्या-
शरद पवारांकडून भाजप नेत्यांवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…
पुतिन यांना मनोरूग्ण म्हणणाऱ्या मॉडेलचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह
मोठी बातमी! शिवसेनेचा मोठा नेता आयकर विभागाच्या रडारवर
‘इस्लाम धर्मच हिंदुस्थानाचा खरा शत्रू’, संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य
‘फडणवीसांनी पुन्हा येण्याची तारीख सांगितली म्हणजेच…’, जयंत पाटलांचा खोचक टोला
Comments are closed.