बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, याचा काय अर्थ?’; एकनाथ शिंदेंचा घणाघात

मुंबई | शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना सोबत घेत बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. राज्यात सध्या सत्तासंघर्ष सुरू असताना शिंदे गट मात्र त्यांच्या मागणीवर ठाम आहे.

नाराज बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे व संजय राऊत यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर बोचरी टीका केली. शिवसेनेच्या या भूमिकेवरून एकनाथ शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे व त्यांचा बाप काढायचा. तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची. याचा काय अर्थ आहे, असा थेट सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली. आमच्यासोबत 50 आमदार असल्याचा खुलासा यावेळी शिंदेंनी केला. तर मी लवकरच मुंबईला येणार असल्याचंही शिंदेंनी स्पष्ट केलं.

 

थोडक्यात बातम्या-

मुकेश अंबानींकडून जिओच्या संचालक पदाचा राजीनामा, आकाश अंबानींना दिली महत्त्वाची जबाबदारी

‘मी काही त्यांची ट्रॅव्हल एजंट नाही’, सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान, म्हणाले…

‘जे नाव एकनाथने दिलं त्याला विरोध नाही’; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

भाजपच्या गोटात हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More