बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उदय सामंतांवरील हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे आक्रमक, म्हणाले…

पुणे | शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत(Uday Samant) हे काल पुण्यात होते. ते काल रात्री तानाजी सावंतांच्या(Tanaji Sawant) घरी जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. कात्रज येथे त्यांची गाडी थांबली असता हल्लेखोरांनी त्यांची गाडी फोडली. पण सुदैवाने सामंत हे सुखरूप आहेत. यामुळे पुणे शहरात आणि राजकारणात खळबळ उडाली आहे.

या हल्ल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी निषेध केला आहे. तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणार आहे, असा इशारा शिंदेंनी दिला आहे. गाडीवर दगड मारून पळून जाणं ही मर्दुमकी नाही. मी पोलिसांशी बोलणार आहे. सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे. कोणी  भडकावू भाषण करून चिथावणी देत असेल तर पोलीस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतील, असं शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

आम्हाला तानाजी सावंताच्या गाडीवर हल्ला करायचा होता पण उदय सांमतांच्या झाला असा दावा हल्लेखोरांनी केला. त्यामुळे सावंत आणि सामंत हे दोघेही संतापले आहेत. सावंत यांनी आठ दिवसात या हल्लाचे उत्तर मिळेल असा इशाराही दिला आहे. आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असं नाही. आम्हीही दोन हात करू शकतो, असंही सावंत म्हणाले आहेत.

दरम्यान, हे हल्लेखोर नेमके कोण आहेत, हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही,तोपर्यंत ते शिवसैनिक आहेत, हल्ला हा पुर्वनियोजित आहे, असे गृहित धरणे योग्य नाही, असं शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे((Nilam Ghore) यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रणिती शिंदेंची मोदी सरकारवर सडकून टीका, म्हणाल्या…

“गद्दारांची गाडी फोडणार त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार करणार”

संजय राऊतांची एकूण संपत्ती किती?, स्वत:च केला होता खुलासा

“ईडीचा वापर 2024 पर्यंत असाच चालणार”

बंडखोर आमदाराकडून आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More