बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

….नाहीतर सामान्य माणूस रस्त्यावर येईल आणि उद्रेक होईल; सुशील कुमार शिंदेंचा इशारा

मुंबई | सरकारनं लॉकडाउन न वाढवता वेळीच योग्य निर्णय घ्यायला हवे, नाहीतर लॉकडाउन वाढत गेला तर रस्त्यावर सामान्य माणसाचा उद्रेक होईल, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

कोरोनाचं संकट मोठं आहे. ते संवेदनशीलतेनं हाताळायला हवं. सर्वकाही ठप्प झालेलं आहे. आज अनेक उद्योग आणि व्यवसाय बंद झाले आहेत. लॉकडाउन लागू केल्यानंतर परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

मी उगाच टीका करणार नाही. पण टाळ्या वाजवून, दिवे लावून यातून सुटका होईल, असं हे संकट नाही, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.

लॉकडाउन कुठपर्यंत वाढवायचा याचाही विचार करायला हवा. कारण लॉकडाउन वाढत गेला, तर लोक खाणार काय? प्रश्न गंभीर आहे. यामुळे एक दिवस सामान्य माणूस रस्त्यावर येईल आणि रोषाचा उद्रेक होईल, असं सुशीलकुमार शिंदेंनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद’; अखिलेश यादव यांची मोदींवर टीका

“काहीजण काँग्रेसच्या तालावर टिपऱ्या खेळत आहेत”

महत्वाच्या बातम्या-

…तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा असं सांगितलं जातंय; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

लॉकडाउनमध्ये थोडा दिलासा; ‘या’ ठिकाणी बससेवा होणार सुरू

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाची तहसीलदाराला मारहाण, हे आहे खरं कारण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More