बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग निवडणुकीच्या रिंगणात!

नवी दिल्ली | राजस्थानमध्ये राज्यसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काँग्रेसने उमेदवारी देण्याचं ठरवलं आहे. 13 ऑगस्टला ते आपला अर्ज सादर करतील.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले मदन लाल सैनी यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. 26 ऑगस्टला या जागेसाठी निवडणूक होणार असून मतदानानंतर संध्याकाळी विजयी उमेदवाराची घोषणा केली जाईल.

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमोहन सिंग पुन्हा एकदा राज्यसभेत दिसण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा राज्यसभेत वापसी करण्यासाठी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, डाॅ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ते आसाममधून राज्यसभा सदस्य होते.

महत्वाच्या बातम्या-

-आमदार-खासदार निवडून आले की कोल्हापूरला… पूर येऊन 5 दिवस झालं तरी ठाकरे ‘मातोश्री’तच!

-साईबाबा संस्थान पूरग्रस्तांच्या मदतीला, दिला 10 कोटींचा निधी

-“खरंच राजं आहात तुम्ही… तुमच्या रूपात आम्हाला छत्रपती शिवराय दिसले”

-काँग्रेस अध्यक्षाची निवड आणि सोनिया-राहुल बैठकीतून बाहेर…!

-प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेवर जोरदार टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More