मुंबई | राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरूवात झाली आहे. हे अधिवेशन गाजणार, अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी होणार, असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यानूसार विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारला पुरतं घेरलं आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे. नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.
इतिहासात असं कधी घडलंच नाही. एक मंत्री जेलमध्ये आहे आणि आणखी राजीनामा दिला नाही. अटकेत असलेला मंत्री मंत्रिपदावर कसा?, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मलिकांनी मुंबई सोबत गद्दारी केली आहे.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते एका मिनिटात हाकालपट्टी केली आसती, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ पाहायला मिळत आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक आक्रमक झाले आहेत. तर सत्ताधाऱ्यांच्या गोंधळामुळे राज्यपाल अभिभाषण अर्ध्यावर सोडून निघून गेले आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘नवाब मलिक हाय हाय’, अधिवेशनाच्या सुरूवातीलाच विरोधक आक्रमक
मोदी व पुतिन यांच्यात दुसऱ्यांदा चर्चा, युक्रेनमधील भारतीयांसंदर्भात धक्कादायक माहिती समोर
“भाजप फक्त हूल देतं, त्याला वादळ नाही आदळआपट म्हणतात”
मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला धक्का
“सरकार पडणार, सरकार पडणार, माझे 170 मोहरे फोडून दाखवाच”
Comments are closed.