मुंबई | महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत 68 गावातील 15 हजार 358 लाभार्थ्यांची नावं आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर काही तासातच ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा करणार असल्याचं म्हटलं होतं. महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. त्याची वचनपूर्ती होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.
आत्तापर्यंत 35 लाख कर्जदात्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे आली आहे. पहिली यादी 24 फेब्रुवारीला आणि दुसरी यादी 28 एप्रिलला जाहीर करणार असल्याचं ठाकरेंनी सांगितलं होतं. येत्या तीन महिन्यात कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचंही ते म्हणाले होते.
टप्प्याटप्प्याने यादी जाहीर केल्या जातील. सरकारच्या नियोजनाप्रमाणे सुरुवातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश यादीमध्ये करण्यात येईल. एप्रिलच्या शेवटपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. pic.twitter.com/mhonnTa8Ox
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 24, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
दहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सचिननं घडवला होता सर्वोच्च इतिहास
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणातील सर्व मुद्दे एकाच ठिकाणी
महत्वाच्या बातम्या-
इंदोरीकर महाराज नगर जिल्ह्याचं भूषण आहेत- सुजय विखे
मोदींच्या नेतृत्वात भारत गरीबीतून बाहेर पडतोय- डोनाल्ड ट्रम्प
एक चहावाला देशाचा पंतप्रधान होणं हे कौतुकास्पद- डोनाल्ड ट्रम्प
Comments are closed.