देश

…अन्यथा 40 लाख ट्रॅक्टर रस्त्यावर उतरवणार; शेतकरी नेत्याचा मोदींना इशारा

Photo Credit- Facebook/Rakesh Tikait & Narendra Modi

नवी दिल्ली | नविन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम असून शेतकऱ्यांकडून राज्यांमधील तसंच राष्ट्रीय महामार्गावर तीन तासांसाठी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे.

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी ऑक्टोबरपर्यंत सरकारला वेळ दिला आहे. तसेच जर मागण्या मान्य झाल्या नाही तर देशभरात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढण्यात येईल, असा इशारा राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

आम्ही सरकरला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. जर तोपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर देशात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढण्यात येईल, असं राकेश टिकैत यांनी म्हटलंय.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आम्ही प्रवास करु. येथील आंदोलनदेखील सुरु राहणार. जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असं राकेश टिकैत म्हणालेत.

 

 

थोडक्यात बातम्या-

“मी माझी सत्याची बाजू मांडली मात्र तरीही मला धमक्यांचे फोन येतात”

“आम्ही शेतकरी आहोत, गरज पडली तर लाथ मारु तेथे पाणी काढू”

“शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का?”

‘उद्या सकाळी शेतात या’, असं व्हॉट्सअ्ॅप स्टेटस ठेवत शेतकऱ्यानी केली आत्महत्या

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीजवळील गाजलेल्या ‘त्या’ खूनप्रकरणातील कुख्यात गजानन मारणेची निर्दोष मुक्तता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या