Top News देश

प्रवासात आजपासून ‘ही’ गोष्ट अनिवार्य, अन्यथा भरावी लागेल दुप्पट रक्कम!

Photo Courtesy- Pixabay

नवी दिल्ली | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानूसार रविवारी(ता.१४) मध्यरात्रीपासून सर्व टोल प्लाझावर कॅश लेन बंद करण्यात येणार आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून याआधीच Fastag अनिवार्य करण्यात आला होता, मात्र १४ तारखेपर्यंत फास्टटॅगविनाही वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करता येत होता.

याआधी १ जानेवारीपासून राष्ट्रीय महामार्गांवर कॅश लेन बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला होता, मात्र जनमताच्या रेट्यापुढे त्याला दीड महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता सर्वांना फास्टॅग बंधनकारक असून ज्याच्याकडे फास्टॅगग नसेल त्याला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

फास्टॅगसाठी आता कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं नुकतंच नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आजपासून यासंदर्भात कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. टोल नाक्यांवर वाद टाळण्यासाठी अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात केले जाणार आहेत.

दरम्यान, देशातील २३ बँकांच्या माध्यमातून फास्टॅगची विक्रीसुविधा सुरु आहे. खात्यात किमान रक्कम ठेवण्याची अटही आता काढून टाकण्यात आली आहे, मात्र फास्टॅग खात्याची रक्कम वजामध्ये गेल्यास बँकांना सिक्युरिटी रक्कम वसूल करता येणार आहे. पुढील रिचार्जनंतर ती संबंधित खातेदाराच्या खात्यातून वजा केली जाईल.

थोडक्यात बातम्या-

IPLच्या लिलावाआधी अर्जुन तेंडुलकरनं दाखवला चमत्कार, एका षटकात 5 षटकार!

उडता रहाणे! मराठमोळ्या अजिंक्यचा झेल सर्वांना अचंबित करणारा, पाहा व्हिडीओ

चिंताजनक! कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, पाहा सविस्तर आकडेवारी

‘…तर आज पूजा जिवंत असती’; पूजाच्या आजोबांची भावूक प्रतिक्रिया

“संजय राठोडसोबत तिचं नाव जोडू नका, आमच्या पूजाचे कोणासोबतही संबंध नव्हते”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या