बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीकरण केंद्रावर महिलांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

भोपाळ | गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत आहे. त्यातच आता पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे देशात ठिकठिकाणी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पण आता या लसीकरण मोहिमेदरम्यान चेंगराचेंगरी होत असल्याचं चित्र समोर येतंय.

खरगोनच्या कसरावद येथील खलबुजुर्ग गावात लसीकरण मोहीम राबवण्यात आली. मात्र लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी जमा झाली. त्यात महिलांसाठी वेगळी रांग करण्यात आली होती. परंतु रांगेत असलेल्या महिलांमध्ये काही वेळातच बाचाबाची झाली. त्यानंतर महिलांनी हाणामारी देखील देखील केली.

शाब्दिक चकमकीचं रुपांतर हाणामारीत झाल्यानं हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या महिलांनी एकमेकींचे केस ओढले आणि नंतर एकमेकींना धक्काबुक्की देखील केली. त्यानंतर काही पुरुषांनी मध्ये पडून त्यांची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न देखील केला परंतु पुरुष मंडळी देखील त्यांना रोखण्यात अपयशी ठरले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना मध्यप्रदेशच्या लसीकरण केंद्रावर घडली होती. या घटनेचा देखील व्हिडीओ व्हायरल झाला होता. लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी झाल्याचं समोर आलं होतं. देशात सर्वत्र लसीकरण केंद्रे वाढवण्याची गरज आता भासू लागली आहे.

थोडक्यात बातम्या – 

“त्यावेळी इंदिरा गांधी पुरत्या बदनाम झाल्या, आता आणीबाणीपेक्षा वेगळं काय घडत आहे?”

राज्यात पावसाचं थैमान; आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

केंद्र सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

चिंताजनक! राज्यातील नव्या बाधितांची आकडेवारी नियंत्रित मात्र मृतांची आकडेवारी….

कुंद्राच्या काळ्या साम्राज्याचा राज उघड, व्हिडीओंसाठी घेतलेले पैसे ऐकाल तर थक्क व्हाल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More