बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डाॅक्टरांना राक्षस संबोधन आलं अंगलट; कॉमेडियन सुनिल पालविरोधात गुन्हा दाखल

मुंबई |  कोरोना काळात रुग्णसेवेसाठी वाहून देणाऱ्या डॉक्टरांची तुलना राक्षसांशी करणं कॉमेडियन सुनिल पाल यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 505 (2), 500 अंतर्गत कॉमेडियन सुनिल पालविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

डॉक्टर रुग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच स्टँडअप कॉमेडियन सुनील पाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये त्यांनी डॉक्टरांना राक्षस म्हटलं आहे. त्यामुळे सुनील पाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. डॉक्टरांविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर असोसिएट ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सच्या अध्यक्षा डॉक्टर सुष्मिता भटनागर यांनी तक्रार दाखल केली आहे. डॉ. सुधीर नाईक यांनी सांगितलं की, डॉ. भटनागर यांनी 20 एप्रिलला पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहिला होता.

‘डॉक्टर हे देवाचे रुप असतात. मात्र, यावेळी 90 टक्के डॉक्टरांनी राक्षसाचं रुप धारण केलं आहे. ते फसवणूक करत आहेत. कोरोनाबाधित असल्याचं सांगून लोकांना रुग्णालयात दाखल केलं जात आहे, त्यांच्याकडून बिले आकारली जात आहेत. इतकंच नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर शरीरातून अनेक अवयवही काढून टाकले जात आहेत’ असं व्हिडीओमध्ये सुनील पाल म्हणाले होते.

दरम्यान, तक्रार दाखल झाल्यानंतर सुनील पाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन माफीही मागितली आहे. ते म्हणाले की माझ्या बोलण्यामुळे कुणाचे मन दुखावले असेल, तर माफी मागण्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. मी दिलगीर आहे. डॉक्टरांना अजूनही देव मानलं जातं, या वक्तव्यावर अजूनही मी ठाम आहे, असंही पाल यांनी सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ – 

Sorry doctor’s 🙏🙏🙏🙏

Posted by Sunil Pal Comedian on Wednesday, May 5, 2021

 

थोडक्यात बातम्या

…म्हणून अशोक चव्हाणांनी मानले खासदार संभाजीराजेंचे आभार

‘कोरोनाची तिसरी लाट अटळ’; केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांचं भाकीत

चिंताजनक! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ

 माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंह चौधरींचं कोरोनामुळे निधन

कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायला उशीर झाल्यास लस परिणाम करेल का?; वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात…

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More