रामराजे नाईक निंबाळकरांवर गुन्हा दाखल करा; आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सातारा | पनवेल जमीन प्रकरणात चौकशी करून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. गोरेंनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

गेल्या 7 ते 8 वर्षात राजकारणात सर्वसामान्य कुटुंबातील लोक येत आहेत. सत्तेचा वापर करत त्यांना टार्गेट करून त्यांचे सामाजिक आणि राजकीय करिअर संपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं गोरेंनी सांगितलं. 

सागर अभंग, श्रीकृष्ण गोसावी आणि अन्य दोन सहकाऱ्यांनी पनवेल येथील जमीनीचा व्यवहार केला. या व्यवहारात अभंग यांची 80 टक्के तर गोसावी यांची 20 टक्के पार्टनरशीप आहे. व्यवहारातून बाजूला होण्यासाठी अभंग यांना रामराजेंनी दमबाजी केली आहे, असा आरोप गोरेंनी केला आहे. 

दरम्यान, पोलिसांकडून याची चौकशी होत नसेल तर सीआयडी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-नारायण राणे संपले नाहीत अजून; विरोधकांनी लक्षात घ्यावं!

-धनगर आरक्षणासाठी भाजप खासदार रस्त्यावर; जाळला महायुतीचा वचननामा!

-मराठा आरक्षणाविरोधात याचिका हा तर विरोधकांचा डाव!

-माजलगावच्या वादग्रस्त DYSP भाग्यश्री नवटकेंवर अखेर कारवाई

-खासदार सुप्रिया सुळे यांना ‘श्रेष्ठ सांसद’ पुरस्कार जाहीर