मुंबई | आज रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं परिणामी रुग्ण संख्याही घटली होती. त्यानंतर महाराष्ट्रात नागरिकांना निर्बधांमधून सूट देण्यात आली आहे.
राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत आता वाढ होताना दिसत आहे. दिवसभरात राज्यात 01 हजार 485 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 02 हजार 078 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.
याशिवाय राज्यात दिवसभरात 27 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात आजपर्यंत 64 लाख 21 हजार 756 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( रिकव्हरी रेट ) 97.04 टक्के एवढा झाला आहे.
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या विषाणूने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोना नेमका कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
थोडक्यात बातम्या-
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! निर्बंधांमधून शिथिलता देण्यासाठी दिले ‘हे’ निर्देश
अबब! 2 वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या ‘या’ कर्णधाराने नाकारली भारतीय प्रशिक्षकपदाची ऑफर
आजची शिवसेना पूर्णपणे उपऱ्यांची; प्रविण दरेकरांचं संजय राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर
नगरमधील एका बड्या मंत्र्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार- राधाकृष्ण विखे पाटील
“मोदी सरकारला अर्थकारण-प्रशासन कळत नाही फक्त उद्योगपती मित्रांचं हित समजतं”
Comments are closed.