बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टी 20 वर्ल्ड कपसाठी ‘हे’ 3 गोलंदाज घेऊ शकतात भुवनेश्वर कुमारची जागा

मुंबई |  आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्युझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. त्याआधी सरावासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 5 कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर होणारा टी 20 वर्ल्ड कप भारतामध्येच घेण्याची बीसीसीआयची इच्छा आहे. त्यामुळे भारतीय संघ तयारीला लागलेला दिसतोय. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज  भुवनेश्वर कुमार गेल्या काहीवर्षात दुखापतीमुळे तो सतत भारतीय संघात आत-बाहेर करत आहे. त्यामुळे त्याच्या जागी आता नवे पर्याय उभा करण्याची गरज भारताला आहे.

भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत भारतीय तीन प्रमुख गोलंदाज त्याची जागा घेऊ शकतात. मोहम्मद सिराजने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी जबरदस्त प्रदर्शन केले होतं, त्यानंतर त्यानं आयपीएलमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याची देखील भारतीय संघात वर्णी लागू शकते. तर स्विंग गोलंदाज आणि नव्या चेंडूवर प्रभावी मारा करणारा दिपक चाहर देखील संघात येण्यासाठी उत्सुक आहे.

भारतीय संघात स्थान मिळवलेला युवा गोलंदाज नवदीप सैनी याने देखील त्याच्या गोलंदाजीनं सर्वांनाच प्रभावी केलं होतं. आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यात त्यानं विरोधी संघाच्या दांड्या गुल केल्या होत्या. भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर देखील सैनीने आपल्या कामगिरीने सगळ्यांना प्रभावित केले. त्यामुळेे त्याची संघात स्थान मिळण्याची शक्यता वाढली आहे.

टी 20 वर्ल्ड कप भारतामध्येच घेण्याची बीसीसीआयची इच्छा आहे. मात्र, अजूनही देशात सध्या रोजच्या कोरोना रूग्णांची संख्या 1.5 लाखापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये ही स्पर्धा भारताच्या बाहेर घेण्याची सूचना आयसीसी बीसीसीआयला करु शकते. काही माजी खेळाडूंनी देखील ही स्पर्धा भारतामध्ये घेणं धोकादायक असल्याचं मत व्यक्त केलं होतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये युएईचा पर्याय बीसीसीआयसमोर आहे.

थोडक्यात बातम्या-

“गरज नसताना उपसमितीचं अध्यक्षपद मराठा समाजाच्या अजित पवार यांना कसं?”

राज ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर अतुल भातखळकरांचं उत्तर, म्हणाले…

म्युकरमायकोसिस हा रोग चिकनमुळे पसरतोय?; जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

दिलासादायक! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाबाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

रितेश देशमुखनं मुलासाठी गायली अंगाई, पाहा बाप-लेकाचा क्युट व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More