बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पैसा भी और इज्जत भी’; माॅरिसच्या खेळीवर विरेंद्र सेहवागची गुगली

मुंबई | अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर राजस्थान रॉयलने दिल्ली कॅपिटल्सवर 3 गडी राखून विजय मिळवला. आयपीएलचा इतिहासात 16.25 कोटीला विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस याने अखेरच्या षटकात आक्रमक फलंदाजी करत राजस्थान रॉयल्सला दमदार विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीमुळे अनेक क्रिकेटर्स खुश झालेत. यातच भारताचा माजी सलामवीर विरेंद्र सेहवाग याने मजेशीर ट्विट केलं आहे.

विरेंद्र सेहवागने दोन फोटो ट्विट केले त्याला मजेशीर मथळा दिला. पहिला फोटो त्यानं राजस्थानच्या पहिल्या सामन्यातला टाकला. त्या फोटोला त्यानं “पैसा मिला पर इज्जत नहीं मिली”, असं कॅप्शन दिलंय. तर दुसरा फोटो त्यांनं दुसऱ्या सामन्यातला टाकलाय. त्याला “इसे केहते है इज्जत…पैसा भी और इज्जत भी…वेल डन ख्रिस माॅरिस, असं कॅप्शन सेहवागनं दिलंय. त्याआधी त्यानं हैद्राबादच्या सामन्यानंतर केन विल्यमसनचा फोटो टाकला होता. त्यात त्यानं ” कैसा है ये तुमको इंतजार मै हूं ना” असं मजेशीर ट्विट केलं होतं.

पंजाब विरूद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयलला अखेरच्या दोन चेंडूवर 5 धावांची गरज होती. चांगली खेळी केलेला संजू सॅमसन मैदानावर टिकून होता. त्यानं फटका मारला परंतू एक धाव होत असूनही संजूने धाव घेतली नाही. नाॅन स्ट्राईकवर असलेला ख्रिस माॅरिस संजूवर वैतागला. अखेरच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना संजूने चेंडू टोलवला पण दिपक हुडाने आरामात झेल घेतला आणि पंजाबला विजय मिळाला होता.

दरम्यान, पहिल्या सामन्यात झालेल्या अपमानाचा बदला माॅरिसने घेतला आहे. त्यानं या सामन्यात 18 चेंडूत 36 धावा चोपल्या. या डावात त्यानं 4 गगनचुंबी षटकार ठोकले आहेत.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी…..

आता ऑक्सिजनचा तुटवडा दूर होणार; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

मॉरिसची फटकेबाजी, 4 सिक्सर ठोकत 16 कोटींचा पहिला हप्ता वसूल, राजस्थानच्या विजयाची नौका पार!

“विरोधी पक्षाचे नेते येतात आणि टीका करतात, पण त्यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी काय दिलं?”

मोठी बातमी! मुंबईच्या हाफकिन संस्थेत लसनिर्मिती होणार, केंद्र सरकारने दिली परवानगी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More