बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चुकून गोळी लागून झाला मित्राचा मृत्यू, अपराधी भावनेतून तीन जणांची आत्महत्त्या

देहरादून | देहरादून येथे अगदी मनाला हेलावून टाकणारी घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. आपला मित्र हा आपल्याला काही सख्ख्या नात्यांपेक्षा देखील प्रिय असतो. अशाच एका मित्रांच्या समूहातील एकाचा मृत्यू चुकून गोळी लागून झाला. त्यानंतर त्याच्या मित्रांना अपराधी भावना येऊ लागली आणि याच भावनेतून त्याच्या तीन मित्रांनी आत्महत्त्या केलं असल्याचं समोर आलं आहे.

उत्तराखंडमधील तेहरी जिल्ह्यातील कुंडी गावाजवळच्या जंगल परिसरात हा प्रकार घडला. 7 मित्रांचा समूह शनिवारी रात्री भिलंगणा ब्लॉकमधील गावातून या जंगलात शिकारासाठी गेला होता. 22 वर्षांचा राजीव या ग्रुपचं नेतृत्व करत होता. त्याच्या हातात गोळ्यांनी भरलेली बंदूक होती. चालताना त्याचा पाय निसटला आणि तो खाली पडला. त्यावेळी त्याच्या खांद्यावरील बंदुकीतून गोळी सुटली आणि संतोष नावाच्या तरुणाला लागली. संतोष खाली कोसळताच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊ लागला.

सोबान, पंकज आणि अर्जुन यांच्या मनात अपराधी भावनेने घर केलं. त्यांनी कीटकनाशक पिऊन आपलं जीवन संपवलं. त्यानंतर राहुल आणि सुमीत या दोघांनी तातडीने याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यांनी तिघांना बेळेश्वर आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी पंकज आणि अर्जुन यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. तर उपचारादरम्यान सोबानने प्राण सोडले.

दरम्यान, सात मित्रांच्या समूहातील तीन जणांचा करुण अंत झाल्यामुळे संपुर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या ग्रूपमधील उर्वरित मित्रांनी त्यांचे चार मित्र गमावल्यामुळे ते सध्या मोठ्या धक्क्यात आहेत.

थोडक्यात बातम्या-

फखर जमान रनआऊट प्रकरण, ‘या’ कारणामुळे क्विंटन डी कॅाकला क्लीनचीट!

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास आता पुण्यातील ‘या’ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार नाहीत!

अदानी समूहाची गरूडभरारी! ‘100 अब्ज डाॅलर्स’ कमवत ठरली देशातली ‘या’ क्रमांकाची मोठी कंपनी.

विवाहितेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, धक्कादायक कारणानं महाराष्ट्राची मान शरमेनं झुकली!

आयपीएलच्या पहिल्या सामन्याआधी कोहलीला मोठा फटका; संघाचा हा मोठा खेळाडू कोरोना पाॅझिटिव्ह

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More