बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाढदिवसाला मैद्याच्या केकऐवजी फळांचा केक कापा; सोशल मीडियावर मागणीनं धरला जोर

पुणे | समाज माध्यमावर सध्या एका विशेष मागणीने जोर धरला आहे. वाढदिवसाला मैद्याच्या केकऐवजी फळांचा केक बनवून जर कापला तर तो आरोग्यासाठीही उत्तम असेल आणि त्यामार्फत फळ उत्पादक शेतकऱ्यांनाही चालना मिळेल. अशा प्रकारची मागणी सध्या समाज माध्यमावर होत आहे. तसेच काही लोक आपले नातेवाईक,  मित्र आणि आप्तेष्टांना फळांचा केक वाढदिवसाला कापावे असं आवाहनही करत आहे.

सोशल मीडियावर अनेक ट्रेंड येत असतात. त्याचबरोबर त्यातले काही लोकांच्या पसंतीसही पडतात. असाच एक ट्रेंड सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे. स्वच्छ ताजी फळं छान सजावट करून त्याला केकच्या स्वरूपात रूपांतर करून तो केक जर वाढदिवस किंवा इतर सोहळ्यासाठी जिथे आपण मैद्याचा केक वापरतो त्याऐवजी वापरला तर तो नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकतो. अशाप्रकारचा संदेश सध्या समाज माध्यमात पसरत आहे.

महाराष्ट्रात चिकू, पेरू, केळी, संत्री, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, कलिंगड या फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे जर फळांच्या केकची मागणी वाढली. तर नक्कीच फळ उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे मिळून त्यांचा फायदा होईल. तसेच मागणी वाढल्यानंतर शेतकरीही फळांचे उत्पादन घ्यायला मागेपुढे पाहणार नाही. बाजाराच्या मागणीवरच शेतकर्‍यांचं उत्पादन अवलंबून असतं. त्यामुळे हा ट्रेंड आपण सर्वांनी मिळून सुरू केलाय आणि तो आपणच मोठा करूया अशा आशयाचा संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शरीरास घातक असलेला अनैसर्गिक घटक बनवून केलेला मैद्याचा केक आपण वाढदिवसाला हमखास कापतो. पण त्याला पर्याय म्हणून जर फळाचा केक ही संकल्पना समोर आली असेल तर ती नक्कीच एक चांगले आणि निरोगी जीवन जगण्यासाठीची प्रेरणाच म्हणावी लागेल. सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी या ट्रेंडला पाठिंबा दिला असून आपापल्या वैयक्तिक अकाउंटवरून ही पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

थोडक्यात बातम्या

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुरलीधर मोहोळ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

चिंताजनक! ‘कोरोना’ लसीचे डोस घेऊनही जिल्हाधिकारी आढळले ‘कोरोना पॉझिटिव्ह’

मोठी बातमी! सचिन वाझेंची ‘या’ विभागात करण्यात आली बदली

पुण्यातील लॉकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले…

अॅमेझाॅन आणि फ्लिपकार्टला टक्कर देणार भारताचा ‘अलिबाबा’; जाणून घ्या अधिक माहिती…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More