Top News क्राईम पुणे महाराष्ट्र

गजानन मारणे प्रकरणी न्यायालयात हायव्होल्टेज ड्रामा, पाहा नेमकं काय काय झालं!

पुणे | 2014 मधील पप्पू गावडे आणि अमोल बधे या दूहेरी खून प्रकरणात गजानन मारणे आणि त्याच्या समर्थकांवर मोक्का लावण्यात आला होता. त्या खटल्यातून आता त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली असल्याने मोठ्या धडाक्यात गजानन मारणेचं पुण्यात स्वागत करण्यात आलं हाेतं. गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्यावर लगेच दहशत पसरवणे, मिरवणूक काढणे आणि जमावबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटक करण्यात आली होती.

याच प्रकरणावर न्यायालयात आपली बाजू मांडत असताना गजानन मारणेच्या बाजूने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. पोलिसांनी त्यावेळेला का अडवल नाही? आणि आम्ही दहशत पसरवली असल्याची तक्रार एकाही व्यक्तीने केली नाही तर आमच्यावर गुन्हा का दाखल केला?, असे प्रश्न मारणेचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयात उपस्थित केले.

गजानन मारणेवर राजकीय आकसापोटी आणि दबावाखाली गुन्हे दाखल केले आहेत, राज्यात इतर राजकीय पक्षांचे मेळावे, कार्यक्रम घेतले तेव्हा कोरोना नव्हता का?, असा प्रश्नही या वेळी वकिलांकडून उपस्थित केला गेला.

गजानन मारणे याने न्यायालयात बोलताना सांगितले की, राष्ट्रीय महामार्गावर हजारांहून अधिक गाड्या होत्या त्यापैकी पाचशे गाड्या माझ्या होत्या हे कशावरून? माझ्यावर होत असलेले सगळे आरोप चुकीचे आहेत. मी जेलमध्ये असताना कट कसा रचेल? मीडियाने तर मला थेट गुंड म्हटलं आहे. माझ्यावर असा कोणताही गुन्हा नसताना मला असं म्हटलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आणखी किती वर्षे टोल वसुली करणार?’; उच्च न्यायालयाने सरकारला सुनावलं

राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता; पाहा काय आहे प्रकरण

आरोग्यमंत्र्यांच्या आवाजातील ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल, राजेश टोपे म्हणाले…

लिव्ह इन म्हणजे सोबत राहणं फक्त, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही- चित्रा वाघ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या