नाशिक महाराष्ट्र राजकारण

मंदिरे बंद ठेऊन राज्य सरकारनं आडमुठेपणा केला आहे- गिरीश महाजन

नाशिक | राज्यातील तीन पक्षांच्या सरकारचा राम मंदिराच्या भूमिपूजनालाच विरोध असून सरकारनं बुधवारी मंदिरे बंद ठेऊन आडमुठेपणा केला आहे, अशी टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर केली आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या धर्तीवर महाजन यांनी श्रीकाळाराम मंदिराच्या बाहेरील श्रीरामाच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळेस बोलताना महाजन म्हणाले की, कोरोना विषाणूचा वाढता धोका दाखवत राज्य सरकारनं मंदिरं बंद ठेवून आडमुठेपणा केला आहे.

राज्यातील मंदिरं खुली असती तर भाविकांनी सोशल डिस्टंसिंगचं पालन करत कालचा दिवस उत्साहात साजरा केला असता. मात्र प्रशासनानं नागरिकांची अडवणूक केली आहे. तीन पक्षांच्या सरकारचा भूमिपूजनालाच विरोध होता. त्यांना ऑनलाइन पद्धतीनं भूमिपूजन हवं होतं. म्हणूनच राज्यातील मंदिरं आज बंद आहेत, असा आरोपही महाजनांनी यावेळेस लगावला आहे.

दरम्यान, शेकडो वर्षांचं स्वप्न पूर्ण होतंय, अयोध्येतल्याच नाही तर जगभरातल्या राम भक्तांनी पाहिलेलं स्वप्न आज कित्येक वर्षानंतर साकार होतंय, अशी भावना भूमीपूजन सोहळ्यानंतर गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“विजयदुर्गची पडझड रोखण्यासाठी आजची बैठक सकारात्मक, शिवभक्तांच्या वतीने मंत्रीमहोदयांचे आभार”

प्रसिद्ध मॉडेल ते UPSC परीक्षेत ९३ वी रँक… , या तरुणीचा प्रेरणादायी प्रवास वाचून थक्क व्हाल..!

पुराचा धोका ओळखून मंत्री हसन मुश्रीफांच्या जिल्हा प्रशासनाला या तातडीच्या सूचना

संयम ठेवलाय म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना भाजपचा सवाल, ‘संयम सुटला तर काय कराल?’

चीनमध्ये नव्या व्हायरसचा धुमाकूळ; तब्बल इतक्या लोकांना झालीय ‘या’ व्हायरसची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या