बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेच नव्या संघनायकाचा! कोहलीनंतर ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर RCBची धुरा?

नवी दिल्ली | आयपीएल (IPL) ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी आणि सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट लीग (Cricket League) आहे.  भारत (India) हा जगातील सर्वाधिक क्रिेकेट चाहत्यांचा देश आहे. परिणामी आयपीएलवर सर्व जगाचं लक्ष असतं. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Captain Virat Kohli) हा आयपीएलमध्ये बंगळूरू (Bengluru) संघाचा कर्णधार (Captain) म्हणून खेळत होता. पण आता त्यानं आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

भारतीय टी -ट्वेंटी कर्णधारपद आणि बंगळूरू संघाच्या कर्णधारपदाचा कोहलीनं राजीनामा दिल्यानं आरसीबीचा नवा कर्णधार कोण हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेत आहे. अशातच आरसीबीच्या कर्णधारपदी यावर्षी विदेशी खेळाडूची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिग्गज क्रिकेटपटू आणि आरसीबीचा प्रशिक्षक डॅनियल व्हिक्टोरी (Danial Victory) यांनी आरसीबीच्या भावी कर्णधाराबाबत भाष्य केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) हा आरसीबीचा नवा कर्णधार असण्याची शक्यता व्हिक्टोरी यांनी वर्तवली आहे. गत आयपीएल मोसमापासून मॅक्सवेल आरसीबीसाठी स्फोटक खेळी करत आला आहे. तसेच मॅक्सवेलला मेलबर्न स्टार्स या संघाच्या कर्णधारपदाचा अनुभवदेखील आहे. अशा परिस्थितीत मॅक्सवेलच्या कर्णधारपदाबाबत संघ विचार करण्याची शक्यता, व्हिक्टोरी यांनी वर्तवली आहे.

दरम्यान, विराट कोहलीनं कर्णधारपद सोडलं असलं तरी तो शेवटपर्यंत फक्त आरसीबीकडून खेळत राहणार असल्याचं कोहलीनंच म्हटलं आहे. परिणामी कोहलीच्या उपस्थितीत आरसीबीला विजेतेपदापर्यंत कोण घेवून जाणार याची सर्वांनाच उत्सूकता आहे.

थोडक्यात बातम्या 

“हा घ्या पुरावा, हिंदुह्रदयसम्राटांच्या वारसांनी घातलेलं सपशेल लोटांगण”

“आम्हाला KL Rahul संघात हवा होता पण…”,रिलीज होताच धक्कादायक खुलासा

Omicronचा धोका वाढतोय; केंद्र सरकारचं महाराष्ट्राला तातडीचं पत्र

“एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष…”, नाना पटोलेंचं जोरदार प्रत्युत्तर

Winter: हिवाळ्यात ठणठणीत रहा; आहारात करा ‘या’ 6 पदार्थांचा समावेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More