मुंबई। सोनं-चांदीचे (Gold-Silver) भाव नेहमी कमी जास्तं होत असतात. लग्नकार्य किंवा एखाद्या सणवाराच्या प्रसंगी सोनं किंवा चांदीची खरेदी म्हणजे खिशाला कात्री लागते.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतात सोन्याचे भाव (Gold Rates) वाढले होते. मात्र, आता सोनं आणि चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला थोडा दिलासा मिळाला आहे. कारण भारतीय सराफांनी दिलेल्या माहिती नुसार आजचे म्हणजे बुधवारचे सोनं-चांदीचे दर (Gold Silver Price Rate) जाहीर झाले आहेत.
सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी दुसरी कडे चांदी मात्र अजून भाव खात आहे .999 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोन्याचा दर 50619 रुपयांवर गेला आहे तर दुसरीकडे एक किलो चांदी 60193 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. चांदीने पुन्हा एकदा प्रतिकिलो 60,000 रुपयांचा टप्पा पार केला आहे.
दरम्यान, सोनं स्वस्त झाला असला तरी दुसरीकडे चांदीच्या भावात वाढ झाली आहे . शुद्धतेचे सोने आज 28 रुपयांनी स्वस्त आहेत. 916 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याच्या दरात 26 रुपयांची घट झाली आहे. त्याचसोबत 720 शुद्धेतच्या सोन्याचा भाव हा 21 रुपयांनी झाला असून 585 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 16 रुपयांनी कमी झाला आहे. जर चांदीचे भाव विचारले तर आजच्या दिवसात चांदी सोन्या पेक्षा महाग असून चांदीचे आजचे भाव 227 रूपयांनी वाढले आहेत.
थोडक्यात बातम्या-
ईडी चौकशीला गैरहजेरी लावत अनिल परब साईचरणी लीन
‘औरंगाबादचा औरंगजेब माझ्या मागे लावून दिला’; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
अंगठीने घेतला जीव; गिफ्ट मागितलं म्हणून प्रियकराने प्रेयसीला संपवलं
‘या’ भाजप नेत्याला उच्च न्यायालयाचा दणका, अटकेची शक्यता
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Comments are closed.