सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना घरावर भाजपचा झेंडा लावावा लागणार??

सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना घरावर भाजपचा झेंडा लावावा लागणार??

शिमला | केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या हिमाचल प्रदेशातील 8 लाख कुटुंबांशी भाजप संपर्क साधणार आहे. आणि ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या मोहिमेअंतर्गत लाभार्थ्यांच्या घरावर भाजपचा झेंडा लावण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत.

आगामी काळात भाजप कार्यकर्ते 8 लाख कुटुंबांशी संपर्क साधणार असून त्यांना लोकसभेसाठी समर्थन देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंग यांनी सांगितलं आहे.

भाजपच्या ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या मोहिमेअंतर्गत 8 कोटी सदस्य आणि समर्थकांना आपल्या घरावर भाजपचा झेंडा लावावा लागणार आहे.

दरम्यान, भाजपच्या या मोहिमेवर विरोधीपक्ष नेते मुकेश अग्नीहोत्री यांनी टीका केली आहे. हा प्रकार लाजिरवाणा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘हे’ माजी उपमुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?

-आघाडीला ‘राज’ साथ देणार का? अजित दादांचं आमंत्रण स्विकारणार?

मोदी सरकारचा राफेल करार यूपीएपेक्षा स्वस्त; ‘कॅग’चा अहवाल

शरद पवारांच्या नुसत्या नावानं ‘माढ्यातलं’ वातावरण झालंय टाईट!

सोशल मीडियाचा वापर वाढवा; प्रियांका गांधींचा काँग्रेस नेत्यांना सल्ला

 

Google+ Linkedin