बीड | संचारबंदीत गावाकडे परतणाऱ्या ऊसतोड मजूरांवर पोलीसांनी मारहाण केल्यानंतर मदतीला गेल्याने गुन्हा दाखल केला. अशा प्रकारचे हजार गुन्हे मी अंगावर घ्यायला तयार आहे. मला अटक करा, जामीनसुद्धा घेणार नाही, असं आव्हान भाजप आमदार सुरेश धस यांनी सरकारला दिलं.
ऊसतोड मजुरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या साखर कारखानदारांनवर कारवाई का नाही असा, प्रश्नही सुरेश धस यांनी केलाय. सुरेश धस यांनी जिल्हा बंदीत हद्द ओलांडली, संचारबंदीच्या नियमाने उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. याबाबत सुरेश धस यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली
पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा वचक राहिलेला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे सध्या जिल्ह्यात नाहीत. ते कोठे आहेत हे कळत नाही. म्हणूनच मी ‘धनंजय मुंडे कळवा आणि हजार रुपये मिळवा’ अशी घोषणा करत आहे, असं सुरेश धस म्हणाले आहेत.
मी ऊसतोड मजुरांसाठी सीमा बंदी कायदा तोडला. मात्र जितेंद्र आव्हाड हे मुंबईवरुन सोलापूरला येतात. एवढंच नाही तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे देखील मुंबईहून बीडला कसे येऊ शकतात? मग त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाहीत, असा सवाल सुरेश धस यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाची लागण झालेल्या बाळाची नर्सकडून करमणूक; ‘सलाम या वीरांना’ म्हणत जयंत पाटलांनी केलं कौतुक
परराज्यातील मजुरांना मुख्यमंत्र्यांचं अभय; दिली ही महत्त्वाची माहिती
महत्वाच्या बातम्या-
लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचं वीज बिल शासनाने माफ करावं- रामदास आठवले
टाळ्या वाजवून, दिवे लावून कोरोनाचं संकट दूर होणार नाही- राहुल गांधी
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कौतुकास पात्र, माझा त्यांना सलाम”
Comments are closed.