बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात राज कुंद्राला न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी चा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी एका कंपनीला पैसे पुरवत होता.

राज कुंद्राला मुंबईतील न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. कुंद्राला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. राज कुंद्रा सोबतच साथीदार रायन थोरपेलासुद्धा जामीन दिला आहे. मागील दोन महिन्यांपासुन राज आणि रायन तुरूंगात होते.

राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड असलेल्या रायन थोरपेला अटक झाली होती. थोरपे हा शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या निकटवर्तीय आहे. वियान गेमिंग प्रायव्हेट लिमीटेड आणि वियान इंडस्ट्रीज या कंपन्यांमध्ये राज आणि रायनने सोबत काम केलं आहे.

दरम्यान, राज कुंद्रावर अश्लिल चित्रपट बनवणे आणि मोबाईल अँपवरून प्रसारित करणे यामुळं अटक करण्यात आली होती. राज कुंद्राच्या घरावरील छापेमारीत हॉटशॉट अॅपसाठी बनवलेल्या व्हिडीओ आणि सर्व्हर पोलिसांच्या हाती सापडले होते.

थोडक्यात बातम्या –

राष्ट्रवादीच्या ‘या’ चार दिग्गज नेत्यांचे जावई किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर

जावेद अख्तर यांनी शिवसेनेच्या दबावाखाली…; कंगनाचा शिवसेनेवर गंभीर आरोप

“कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एनडीएमध्ये यावं, मोदी सर्वांचा सन्मान करतात”

रश्मी ठाकरेंच्या संपत्तीबाबत सोमय्यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार!

“केवळ मोदी लाटेच्या जीवावर निवडणुका जिंकू शकत नाही कारण…”; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More