बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांवर कविता लिहिल्याने गुजरात साहित्य परिषदेने कवयित्रीला ठरवलं नक्षली!

गांधीनगर | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगा नदीत अनेक मृतदेह वाहताना पाहून गुजरातच्या कवयित्री पारुल खक्कर यांनी यावर कविता केली. मात्र याच कवितेवरुन गुजरात साहित्य परिषदेने या कवयित्रींना थेट नक्षली ठरवलंय. या वरून नवा वाद तयार झाला आहे. साहित्य परिषदेने कवयित्रींवर अराजकता पसरवण्याचा आरोप केलाय.

या कवितेत ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर करण्यात आलाय तो कवितेला शोभत नाही. अशाप्रकारची विचारसरणी केवळ केंद्र सरकारच्या विरोधी विचारसरणीत आहे. हा विचार नक्षली साहित्यिकांचा आहे, असं परिषदेने आपल्या ‘शब्दसृष्टी’ या नियतकालिकाच्या संपादकीयमध्ये म्हटलंय. तसेच कवितेतील मतांशी सहमत नसल्याचंही परिषदेने म्हटलंय.

ही कविता नसून अराजकता पसरवण्याचा प्रकार आहे. ही कविता कोणत्याच दृष्टीकोनातून कविता नाहीये. हा केवळ विनाकामाचा आक्रोश आहे, असं साहित्य परिषदेने म्हटलं आहे. मात्र  व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवल्यानं कवयित्री नक्षली कशा? असाही संतप्त सवाल साहित्य क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे

दरम्यान, खरा लिहिता लेखक हा सत्याचीच बाजू घेतो. उन्मादात बुडालेल्या गुजरातमधून आलेला पारूल यांचा आवाज खतरनाक होता. आता तो तिथल्या मोदी शहा या रंगा-बिल्ला चमचांना बोचतो आहे. अकादमीचे अध्यक्ष दुतोंडी असून त्यांचा जाहीर निषेध आहे, अशा शब्दांत महाराष्ट्रातील कवी संतोष पवार यांनी गुजरात साहित्य अकादमीचा समाचार घेतलाय.

थोडक्यात बातम्या- 

‘शिवसेनेला जो काही धडा शिकवायचा आहे तो….’; चंद्रकांत पाटलांचा इशारा

रितेश-जेनेलियाचा ‘तो’ मजेशिर व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

नरेंद्र मोदी देशातील आणि भाजपचे सर्वात मोठे नेते- संजय राऊत

कोरोनामुळे ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास मेंदुवरही होऊ शकतो परिणाम!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More