बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे, मुलीने चांगलं काम केलं म्हणून प्रोत्साहन द्यायला हवं”

जळगाव | केळी पीक विम्याचे निकष बदलल्यानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं आता सोपं झालं आहे. यावरून भाजप आणि महाविकासआघाडी यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. तसेच राज्याचे पाणी पुरवठा योजना मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यावर जोरदार घणाघात केला होता. त्यावर आता रक्षा खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

केळी पीक योजनेच्या नुकसान भरपाईचे निकष बदल करण्याचे श्रेय मी घेत नाही. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी माझ्यावर टीका न करता मुलीने चांगलं काम केलं म्हणून प्रोत्साहन द्यायला हवं, असा टोला रक्षा खडसे यांनी लगावला आहे.

हवामानावर आधारित फळपीक विम्याचे निकष राज्य शासनाने बदलले आहेत. पण भाजप खासदार रक्षा खडसे या केंद्राने निकष बदलल्याचा खोटा दावा करत आहेत. कुठे लग्न दिसले की आपला वाजा घेऊन त्या ठिकाणी वाजवण्यास त्या हजर होतात, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. त्यावर रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, एकीकडे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ओबीसी आरक्षणावरून टीकाटिप्पणी सुरू आहे. तर आता दुसरीकडे याच मुद्द्यावरून नणंद-भावजय आमने सामने आल्या आहेत. रक्षा खडसे आणि रोहिणी  खडसे यांच्यात चांगलेच आरोप प्रत्यारोप होत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी करावी”

“एरव्ही महापौर मोहोळ मुंगी चिरडली तरी छाती पिटत तिच्या मयताला पोहोचतात, पण…”

‘बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करा’; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

‘…तर कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसची गरज नाही’; ICMR च्या रिसर्चमधून महत्वाची माहिती समोर

पावसामुळं गंगेच्या पाणी पातळीत वाढ; किनारी वाळूत दफन केलेले मृतदेह बाहेर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More