बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आता राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुलाबराव पाटील यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.

माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि आपली कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती, असं ट्विट गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

कोरोना रुग्णांच्या आकड्यांचा आलेख फेब्रुवारीपासून वेगाने वाढतो आहे. गुरुवारी या संख्येने कहर केला आणि महाराष्ट्रात नवीन रुग्णसंख्येच्या सप्टेंबरच्या आकड्यालाही मागे टाकलं. गेल्या 24 तासांत राज्यात 25833 नवे रुग्ण सापडले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

गच्चीत उभा असताना त्याचा तोल गेला, अन्…, पाहा व्हिडीओ

झोमॅटो वाद प्रकरणात आला मोठा ट्विस्ट; डिलिव्हरी बाॅयवर आरोप करणारी महिला फरार

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आता ‘या’ व्यक्तीची ATS कडून चौकशी

“शाळेत डान्सबार, लॉज आणि मद्यविक्रीची परवानगी द्या”

‘लोकसभा निवडणुकीवेळी मला…’; कंगणा राणावतचा मोठा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More