Top News जळगाव महाराष्ट्र

चावटपणा करणाऱ्याची फक्त चौकशीच नाही तर त्याला आत टाका- गुलाबराव पाटील

जळगाव | भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर चुकीचा उल्लेख करण्यात आला होता. याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे अशातच यावर शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. कोणत्याही महिलेच्या विरुद्ध कुणी असं आक्षेपार्ह लिहित असेल तर त्याची फक्त चौकशीच नाही तर त्याला शिक्षाही झाली पाहिजे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

महिलांचा सन्मान ठेवणारं आमचे राज्य आणि देशही आहे. त्यामुळे अशा प्रकारचा चावटपणा करणाऱ्याला आत टाकलं पाहिजे अशी मागणी गुलाबराव पाटलांनी केली आहे. यावर रक्षा खडसेंनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, माझ्याकडे व्हॉट्सअॅपवर याबाबत जे काही स्क्रीनशॉट आलेत त्यात हा प्रकार ‘सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी’ म्हणून असलेल्या पेजवरुन व्हायरल झाल्याचे दिसत आहे. हे पेज कोण चालवतो, त्याची मला माहिती नाही. पण या प्रकाराची पोलीस आणि आमच्या पक्षाकडून चौकशी सुरु आहे, असं खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

“भाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हतं तेव्हा आपल्या कुटुंबाने पक्षाचं काम केलं”

‘देवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य

“लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार?”

गृहमंत्री जी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…- चंद्रकांत पाटील

भाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या