बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकाच षटकात हार्दिक पांड्याने मारले तीन गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडीओ

पुणे | भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर 7 धावांनी विजय मिळवला. यासोबत भारतीय संघाने ही मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर 330 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने 322 धावा केल्या. पहिल्या डावात फलंदाजी करताना हार्दिक पंड्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता.

सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांना चांगलेच चोपून काढले. हार्दिक पंड्याने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. यासोबतच त्याने मोईन अलीच्या एकाच षटकात 3 गगनचुंबी षटकार चांगलेचं लगावले होते. त्याच्या या षटकारांचा व्हिडीओ ‘बीसीसीआय’ने आपल्या वेबसाईटवर शेअर केला आहे.

पहिल्या डावात फलंदाजी करत असताना 28 वे षटक फेकण्यासाठी मोईन अली गोलंदाजीला आला होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याने षटकार लगावला. त्यानंतर षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने पुन्हा एकदा षटकार लगावला. तसेच शेवटच्या चेंडूवर त्याने पुन्हा एकदा षटकार लगावला. यापूर्वी देखील त्याने फिरकी गोलंदाजांना एकाच षटकात 3 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.

दरम्यान, या सामन्यात भारताने इंग्लंडला 330 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंड संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या बेन स्टोक्सचा झेल हार्दिक पंड्याने सोडला होता. मात्र, नंतर शिखर धवनने त्याचा झेल घेतल्यानंतर हार्दिक पांड्याला भर मैदानात साष्टांग दंडवत घालताना पाहायला मिळाले.


थोडक्यात बातम्या – 

‘मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टीत फिरावं अन्…’; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

‘त्यानं माझ्या स्कर्टमध्ये हात घातला अन्…’; ‘या’ अभिनेत्रीनं सांगितलं होळी न खेळण्यामागचं धक्कादायक कारण

भाजप नेत्याकडून भाजपच्याच कार्यकर्त्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

शरद पवारांना नेमकं काय झालंय?; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

…म्हणून हार्दिक पांड्यानं भर मैदानात घातला साष्टांग दंडवत, पाहा गमतीदार व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More