“मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली, संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा”
मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अधिवेशनाआधी संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. आता या रिक्त असलेल्या वनमंत्री पदावर बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी दावा सांगितला आहे.
संजय राठोडांची जागा आता मला द्या, अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्याऐवजी मला मंत्री करा, असं हरिभाऊ राठोड यांनी पत्रात म्हटलं आहे.
आपण विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेच्या आमदारांना निवडूण आणण्यासाठी काम केल्याचं सांगून आपला संपर्क आणि काम प्रत्येक जिल्ह्यात आहे. आपण भटक्या विमुक्त जाती, बारा बलुतेदार आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व केल्यासं सांगत हरिभाऊंनी आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली तर त्याचा फायदा शिवसेनेला संपूर्ण राज्यात होईल, असं हरिभाऊ राठोड यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेनेमध्ये बिनशर्त प्रवेश केल्याचं सांगत सत्तेत आल्यास खारीचा वाटा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याची आठवणही हरिभाऊ राठोड यांनी उद्धव ठाकरेंना करून दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
रस्त्यावर आडवं पडून सरकारविरोधात घोषणाबाजी, पडळकरांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल!
मास्क आणि पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 14 जण जखमी
नवऱ्याला खुर्चीला बांधलं, दाखवला पाॅर्न व्हिडीओ आणि धारदार चाकूनं कापला…
‘तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’; अनिल बोंडे आणि पोलिस अधिकाऱ्यात बाचाबाची! पाहा व्हिडिओ
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात 3 दिवसांचा जनता कर्फ्यू
Comments are closed.