बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्यांनी आपलं मंत्रिपद भाड्यानं दिलंय’; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला

बीड | आज राज्यात दसरा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आपल्या राज्यात राजकीय दसऱ्याची सुद्धा एक वेगळी परंपरा आहे. शि़वसेना शिवाजी पार्कवर तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे भगवान गडावर दसरा मेळावा घेऊन आपल्या समर्थकांना संदेश द्यायचे. या दसऱ्याला शिवेसना ष्णमुखानंद सभागृहात तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा आयोजित केला आहे.

पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात राजकीय तसेच सामाजिक मुद्द्यांवर जोरदार फटकेबाजी केली आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या समर्थकांना संबोधित करण्यासाठी दरवर्षी दसरा मेळावा घेण्याची परंपरा सुरू केली. गोपीनाथ मुंडे यांची परंपरा पंकजा मुंडे समर्थपणे पुढे नेत आहेत. यावेळी पंकजा मुंडे यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

पीक विमा आला का?, राज्य सरकारची मदत आली का?, या शब्दात पंकजा मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यांनी आपलं मंत्रीपद भाड्यानं दिलं आहे, अशी जहरी टीका पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे. आजच्या दसरा मेळाव्यात पंकजा आणी चौफेर फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं आहे.

दरम्यान, राज्यभरातून गोपीनाथ मुंडेना मानणारे कार्यकर्ते आजच्या दिवशी भगवान भक्तीगडावर येतात. पुर्वी हा दसरा मेळावा भगवान गडावर व्हायचा पण गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मेळाव्याच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या 

‘मला ‘या’ ठिकाणी किमान 1 तास बसायचंय’; नितीन गडकरींनी व्यक्त केली इच्छा

‘घरचे सांगायचे मुलगा डायरेक्टर आहे, म्हणून…’; अजित पवारांनी सांगितला लग्नाचा किस्सा

‘त्या’ ऑडिओ क्लिपबाबत रामदास कदम यांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, म्हणाले…

IPL 2021चा चॅम्पियन कोण? फायनलमध्ये ‘या’ 8 खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

“आम्हाला जेल नवी नाही, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसेना”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More