मुंबई | पालघरमध्ये घडलेल्या प्रकरणाने संपूर्ण देशात संपापाची लाट पसरली आहे. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी राज्याला संबोधित केल्यानंतर आज गृहमंत्री अनिल देशमुख यंनी फेसबुक लाईव्हद्वारे याचप्रकरणावर दीर्घ भाष्य केलं.
सध्या संपूर्ण देश कोरोनाविरूद्ध लढाई देत आहे. मात्र ही लढाई लढत असताना पालघरला अतिशय दुर्दैवी घटना घडली. पालघरची घटना घडल्यानंतर 8 तासात 101 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसंच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्द केला आहे, अशी माहिती त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली.
काहीजण पालघर प्रकरणी राजकारण करत आहेत. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की ताब्यात घेतलेल्या 101 जणांपैकी एकही मुस्लिम नाहीये. त्यामुळे या प्रकरणावरून कृपया राजकारण करू नका. जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. सध्या ही वेळ राजकारण करण्याची नाही, अशा शब्दात त्यांनी विरोधकांचे कान टोचले.
दुसरीकडे वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईनचा पीरियड संपत आहे. आम्ही सीबीआयला पत्र लिहून वाधवान कुटुंबाला त्यांच्या ताब्यात घेण्याची विनंती केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातम्या-
‘बिल्डरांनी वाट लावली, लाज वाटायला हवी’; झोपडपट्ट्यांमधील वाढत्या कोरोनामुळे रतन टाटा आक्रमक
‘परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा’; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
महत्वाच्या बातम्या-
मंत्री जितेंद्र आव्हाड रूग्णालयात दाखल
अबब!!! फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवले ‘एवढे’ हजार कोटी
Good News… कोरोनावर लस शोधल्याचा ऑक्सफर्डचा दावा; या दिवशी लोकांवर केली जाणार चाचणी
Comments are closed.