पुणे महाराष्ट्र

पत्नीसाठी अनिल देशमुख यांनी येरवडा कारागृहातून खरेदी केली पैठणी!

पुणे | गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पत्नीसाठी सुंदर पैठणी खरेदी केली आहे. शुक्रवारी सौ. आरती यांच्यासाठी अनिल देशमुख यांनी ही पैठणी खरेदी केली आहे.

देशमुख यांनी शुक्रवारी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. या ठिकाणी कैद्यांच्या श्रमातून बनणाऱ्या अनेक वस्तूंचं विक्री केंद्र आहे.

याच केंद्रातून गृहमंत्र्यांनी तुरुंगातील कैद्यांनी विणलेली पैठणी आपल्या पत्नीसाठी खरेदी केली. पैठणी घेतल्यानंतर देशमुख यांनी आग्रहाने किंमतही दिली आहे.

तुरुंगात येणारा प्रत्येकजण जन्मजात किंवा सराईत गुन्हेगार असतोच असं नाही. संतापाच्या भरात किंवा परिस्थितीमुळे काहींच्या हातून गुन्हा घडून जातो. त्यानंतर न्यायदेवतेने सुनावलेली शिक्षा ते भोगत असतात. पण म्हणून त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावला जात नाही. केलेल्या चुकीची शिक्षा भोगून झाल्यावर त्यांना पुन्हा समाजात सामावून घ्यायचं असतं, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आमदार दिलीप बनकरांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!

हाफ चड्डी घालून भाषणं करणं हा राष्ट्रवाद नव्हे तर…- सचिन पायलट

“महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे”

माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन

“आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच कोरोनाची लस टोचवून घ्यावी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या