बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”किती शेतकऱ्यांचा बळी जाऊ देणार मोदीजी? मारेकऱ्यांना अटक करून सीबीआय चौकशी करा”

नवी दिल्ली | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा लोन आता उत्तर प्रदेशमध्ये ही बघायला मिळत आहे. लखीमपूर खेरी जिल्हयात शेतकरी आंदोलन करत असताना झालेल्या हिंसाचारात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. तर 2 शेतकऱ्यांचं निधन झालं आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सगळीकडून संताप व्यक्त केला जात असताना विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे.

सत्तेची अशी नशा तुम्हा कधी पहिली किंवा ऐकली नसेल. 3 आंदोलक शेतकऱ्यांना मंत्र्याच्या मुलाने गाडीखाली चिरडून मारलं. किती शेतकऱ्यांचा बळी जाऊ देणार मोदीजी?, मारेकऱ्यांना अटक करा, सीबीआय चौकशी करा, कुटुंबाला नुकसानभरपाई द्या, अशी मागणी आपचे खासदार संजय सिंह यांनी केली आहे.

मोदीजी, तुम्ही याआधी एकदा म्हटलं होतं की एखादं कुत्र्याचं पिल्लू जरी गाडीच्या टायरखाली आलं तरी दु: ख होतं. परंतु आज तर चक्क तुमच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना त्याच्या टायरखाली चिरडलं. यासाठी तुम्हाला वेदना कधी जाणवतील?, बोला काहीतरी प्राईम मिनिस्टर? अशी टीका काॅंग्रेस नेते इम्रान प्रतापगढी यांनी केली आहे.

दरम्यान, उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्याविरोधात सुरू होतं. त्यावेळी त्याठिकाणी हिंसा झाली. त्यावेळी  अजय मिश्रा यांचा मुलगा मिश्र मोनू यांनी शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवली. त्यामुळे शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या गाड्या पेटवून दिल्या.

 

थोडक्यात बातम्या-

धोका वाढला! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्हयात कोरोनामुळे पुन्हा 61 गावांमध्ये कडक लॉकडाउन

भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हारल!

किंगखानच्या लेकाच्या अडचणीत वाढ! ड्रग प्रकरणात न्यायालयाने दिला हा निर्णय

“राष्ट्रवादीमध्ये आल्यावर भाजपमधील गद्दार कोण हे समजलं, टरबूज सर्च करा मग कळेल”

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नटूकाका यांचं निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More