बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्याचा लेक बनला ‘गरूड कमांडो’.. देशात 59 वा क्रमांक मिळवून आई बापाच्या कष्टाचं चीज!

अक्षय आढाव, प्रतिनिधी | आपल्या मुलाने चांगलं शिकावं… मोठं होऊन समाजात आपलं नाव कमवावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. आई वडिलांच्या इच्छेखातर आणि आपली स्वप्न साकार करण्यासाठी अनेक मुलं झोकून देऊन परिश्रम करत असतात. 12-12 तास अभ्यास करत असतात. कर्जत तालुक्यातील खैदानवाडी गावच्या ऋषिकेश सायकरने भारतीय वायुदलाने घेतलेल्या परीक्षेत घवघवीश यश मिळवून गरूड कमांडो पदाला गवसणी घातली आहे.

देशात 59 वा क्रमांक मिळवून त्याने आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे. भारतीय वायुदलात निवड होण्यासाठी तो स्वप्नांचा पाठलाग करत होता. चार वर्ष तो यासाठी सतत मेहनत करत होता. जुलै 2019 मध्ये भारतीय वायुदलाने परीक्षा घेतली होती. जून 2020 मध्ये लागलेल्या निकालात  ऋषीकेशने हे यश मिळवलं आहे.

ऋषीकेशचे वडिल शेतकरी आहेत तर आई गृहीणी आहे. घरातली परिस्थिती जेमतेम.. पण देशासाठी सैन्यात भरती व्हायची ऋषीकेशची जिद्द होती. त्यानुसार त्याने दहावी झाल्यापासून अभ्यासाला सुरूवात केली होती.  3 वर्ष त्याने एनसीसीमध्ये देखील आपली छाप उमटवली. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या शिक्षकांचं तसंच मोठा भाऊ सागरचं त्याला मार्गदर्शन लाभल्याचं ऋषिकेशने सांगितलं.

त्याला मिळालेल्या यशाने आई वडील भारावून गेले आहेत. पोराने आमच्या कष्टाचं चीज केलं अशा भावना ऋषिकेशच्या आईवडिलांनी व्यक्त केल्या तर मला देशसेवा करायला मिळेल, यापेक्षा दुसरा आनंद कुठला? अश्या भावना स्वत: ऋषिकेशने व्यक्त केल्या. ऋषिकेशच्या निवडीबद्दल पंचक्रोशीतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

बाबा, तुम्ही सोबत असल्यावर माझ्या अंगात हत्तीचं बळ येतं; खडसेंच्या लेकीची भावूक पोस्ट

दिलासादायक! देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं

महत्वाच्या बातम्या-

वडील टेम्पोवर ड्रायव्हिंग करत होते, त्यांना तिथंच कळालं आपला मुलगा तहसीलदार झाला!

ऑनलाईन अभ्यासामुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम, गुजरात हायकोर्टाचा सरकारला हा सवाल

पिंपरी-चिंचवडमधल्या PSI ला तब्बल इतक्या लाखांची लाच घेताना अटक!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More