बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे”

ठाणे | गुडीपाडव्याला मनसे प्रमुख राज ठाकरेंनी जोरदार हल्ला केला होता. त्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं. भोंग्याच्या विषयावर वाद झाल्यानंतर आता मनसेनं उत्तर सभेचं आयोजन ठाण्यात केलं आहे. राज  ठाकरेंनी भाषणाच्या सुरूवातीपासूनच ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सुप्रिया सुळेंना बोलायचं नाही. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरेंनी पत्रकारांच्या भूमिकेवर बोट ठेवताना राज्यात काही पत्रकार पक्षाचं काम करत असल्याची टीका केली आहे.

मला कंपनीच्या संचालक असल्यामुळं ईडीची आली, मी त्यावेळी चौकशीला सामोरं गेलो होतो. पवार साहेबांना फक्त ईडी येणार हे कळलं होतं तर किती मोठा गोंधळ झाला, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मी कोणत्याही नोटीसला घाबरत नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

मला कायदेशीर नोटीस येऊ द्या, मला कसलीही नोटीस येऊ द्या, मी नोटीसला भीक घालत नाही, असं आक्रमकपणे राज  ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरेंनी राज्याच्या गृहविभागावर देखील जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांच्या हल्ल्यावेळी इंटेलिजन्स काय करत होती, असं ठाकरे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या –

“वसंत सेना ते पवार सेना असा शिवसेनेचा प्रवास”, संदीप देशपांडेंनी डिवचलं

वसंत मोरे ऑन फायर! चंद्रकातदादा म्हणाले, “वसंत तुम्ही भाजपात या, मी म्हणालो…”

“माझ्या नादाला लागायचं नाय, असे 100 जण तंगड्याला बांधून फिरते ही चित्रा वाघ”

“सदावर्तेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 50 हजार रूपये बक्षीस देणार”

रुपाली चाकणकर यांची चित्रा वाघ यांच्यावर घणाघाती टीका, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More