Top News राजकारण

मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नव्हती; नितीश कुमारांचा मोठा खुलासा

बिहार | बिहारच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा एकदा जेडीयूचे नितीश कुमार विराजमान होणार आहेत. उद्या म्हणजेच सोमवारी त्यांचा शपथविधी पार पडणारे.

दरम्यान शपथविधी पार पडण्याअगोदर नितीश कुमार यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती असं नितीश कुमार यांनी सांगितलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत.

नितीश कुमार म्हणाले, “माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. भाजपामधून कोणीतरी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटत होतं. मात्र भाजपाने केलेल्या आग्रखातर या पदाची धुरा सांभाळणार आहे.”

नितीश कुमार सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. तर आजच्या बैठकीमध्ये एनडीएच्या नेतेपदी नितीश कुमार यांची निवड करण्यात आलीये.

महत्त्वाच्या बातम्या

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमारांची वर्णी; उद्या घेणार शपथ

प्रसिद्ध अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन

पुढील 10 ते 20 वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाहीये- बाबा रामदेव

“केवळ 40 जागांवर नितीश कुमार कसे मुख्यमंत्री बनू शकतात?”

दिवाळीनिमित्त शुभेच्छा देणाऱ्या कोहलीच्या व्हिडीयो मेसेजवर चाहते संतापले, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या