बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मला कोरोना झाल्यानंतर किती लोकांनी देव पाण्यात ठेवले माहित नाही, पण… – उदयनराजे भोसले

सातारा | खासदार उदयनराजे भोसले नेहमीच त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ते कोणत्याही गोष्टीवर बेधडकपणे बोलताना दिसतात. यामुळे अनेकदा ते वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले आहेत. अशातच आता उदयनराजे भोसले यांनी कोरोनविषयी एक अजब वक्तव्य करताना विरोधकांना मिश्किल टोला लगावला आहे.

मला कोरोना झाल्यानंतर किती लोकांनी देव पाण्यात ठेवले माहित नाही. परंतु आज मी धडधाकट तुमच्यासमोर उभा आहे, असा टोला उदयनराजे भोसलेंनी लगावला आहे. बुधवारी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना उदयनराजेंनी हे वक्तव्य केलं आहे.

माध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, मला कोरोना झाला होता की नाही हे मला माहित नाही. परंतु मला ताप आला होता तरी देखील मी गार पाणी पीत होतो. यामुळे माझा खोकला वाढत गेला आणि माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली.

तसेच आता कोणी माझी काळजी करू नका. मला कोरोना झाल्यानंतर किती लोकांनी देव पाण्यात ठेवले होते हे मला माहीत नाही. परंतु आज मी तुमच्यासमोर उभा आहे, असा मिश्किल टोला यावेळी उदयनराजे भोसलेंनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या –

शिवसेनेशी पंगा नंतर फोन, आता थेट भेट; अमित शहा आणि राणेंमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

‘या’ कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी; वैज्ञानिकांचा दावा

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

“बिग बॉस’चा आवाज पुरुषाचाच असल्यामुळे…’; बेधडक तृप्ती देसाईंचा गौप्यस्फोट

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More