बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केवळ पित्याला दिलेलं वचन म्हणून मी मुख्यमंत्रीपदावर बसलोय”

मुंबई | शुक्रवारी सन्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर  मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटली होती. त्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे.

केवळ पित्याला दिलेल वचन म्हणून मी मुख्यमंत्रीपदावर बसलो आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाजपने आम्हाला मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता, असा दावा शिवसेनेने वारंवार केला आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला दिलेलं वचन मोडल नसतं, तर आज तुम्ही मुख्यमंत्री असता, असा म्हणत अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे. अहंपणा आला की, माणूस संपला. अहंपणाला कधीही तुझ्या डोक्यात येऊ देवू नको,असं माझ्या आईवडिलांनी शिकवलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्रावर ॲसिड फेकताय, अरे कुठे फेडाल हे पाप”

“मै तो फकीर हूं असे दरिद्री विचार आमचे नाहीत”

“महाराष्ट्रात लोकशाहीचा खून तर यूपीत काय लोकशाहीचा मळा फुलला आहे का?”

“जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे उमेदवार नाहीत, उपरे आणावे लागतात”

“शब्द जपून वापरतोय नाहीतर फाडायला काही वेळ लागत नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More