बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जी जबाबदारी मिळालीये त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन- भारती पवार

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात एकूण 43 जणांना आज मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्यात 11 महिलांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांचीही केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली आहे. यावर भारती पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जनतेच्या आशीर्वादाने हे सरकार स्थापन झालं आणि या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. यासाठी मी जनतेचे आभार मानते, असं भारती पवार म्हणाल्या.

जी जबाबदारी मिळाली आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असंही भारती पवार यांनी म्हटलं. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचेही आभार मानले आहेत. भारती पवार यांचं केंद्रीय मंत्रीपदासाठी अचानक नाव समोर आलं. त्यानंतर जाहीर झालेल्या 43 जणांच्या यादीत भारती पवार यांचं नाव पाहायला मिळालं. भारती पवार यांनी 23 मार्च 2019 रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

दरम्यान, राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. सर्वात आधी नारायण राणे पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 43 नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि डॉ. भागवत कराड या महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी हिंदीत आणि ईश्वर साक्षीने शपथ घेतली.

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील ‘या’ भागांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार!

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्यात चकमक; जवानांकडून पाच अतिरेक्यांचा खात्मा

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर शिवसेनेचं आव्हान, म्हणाले…

‘बिघडलंय तर इंजिन आणि बदलले डबे’; मंत्रीमंडळाच्या विस्तारावर महाविकास आघाडीची टीका

‘आता कुणाला काय सीडी लावायची, ती लावावी’; भाजपचं थेट खडसेंना आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More