नवी दिल्ली | सध्या कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं आहे. जगभरात कोरोनामुळं बळी गेलेल्यांची संख्या पाच हजाराहून अधिक झाली आहे. सेलिब्रिटीदेखील करोनाच्या कचाट्यात सापडले आहेत.प्रसिद्ध अभिनेता एद्रिस एल्बा याला देखील करोना विषाणूची लागण झाली आहे.
आज सकाळी मला करोना विषाणूची लागण झाल्याचं समजलं. खरं तर मला करोनाचं कुठलंही लक्षण झाल्याचं जाणवलं नाही. परंतु तरीही माझी चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे माझी विनंती आहे कृपया दुर्लक्ष करु नका. सुरक्षित घरीच थांबा, असं ट्वीट करून एद्रिसने सांगितलं आहे.
एद्रिस एल्बा हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. या ट्वीटमध्ये त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्याने म्हटलं आहे.
दरम्यान, अभिनेता टॉम हँक्स, क्रिस्तोफर हिव्ह्यू, अभिनेत्री रीटा विल्सन, फूटबॉलपटू कॅलम हडसन, स्पेनच्या संसदेतील खासदार आयरेन माँटेरो यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.
ट्रेंडिंग बातम्या-
शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचं नातं तोडाव नाहीतर… – रामदास आठवले
कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा बळी!
महत्वाच्या बातम्या-
“मुंबई लोकल 7 दिवस बंद ठेवल्यास कोरोना संसर्ग टाळता येईल”
कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा बळी!
…अन् तेव्हापासून आईनं माझं नावं दगडू असं ठेवलं- सुशीलकुमार शिंदे
Comments are closed.