बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गुन्हेगार माझे होर्डिंग्स लावत असतील, तर त्यात माझा काय दोष?”

पुणे | राज्यामध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या हळू-हळू कमी होत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचं दिसत आहे. मात्र तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. यामध्ये कार्यक्रम मोजक्या लोकांमध्ये करणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे पूर्वीचे सगळेच नियम लागू आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन त्यांच्या कार्यकर्त्यांना केलं होतं. या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच 22 जुलै रोजी असतो. आता दोन्ही नेते एकमेकांचे विरोधक असल्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्याच्या वाढदिवसाचे पुणे तसेच पिंपरी चिंचवडमध्ये होर्डिंग्स लावले आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करत एकमेंकाना आव्हान दिलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

यावरून अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे. मी होर्डिंग्स लावायला सांगितले नव्हते. त्यामुळे गुन्हेगार माझे होर्डिंग्स लावत असतील तर त्यात माझा काय दोष, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच जर कोणी चुकीचं काम करत असेल, तर त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी ,असंही त्यांनी सांगितलं आहे.

आज अजित पवारांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना माझी स्पष्ट मतं माहित आहेत. त्यामुळे होर्डिंग्सचा कोणीही मुद्दा उपस्थित करणं योग्य नाही. या भागामध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे होर्डिंग्स जर चुकीचे लागले असतील, तर भाजपने कारवाई करावी, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

आजही मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुलीनं पोलीस ठाण्यात धाव घेत सांगितली आपबीती!

पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तासात धोधो पाऊस कोसळण्याची शक्यता

“लोकांनी पुढे येऊन राज कुंद्रासारख्या लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे”

द्रविडचा एक मेसेज अन् चाहरनं सामना पालटवला, वाचा नेमकं काय सांगितलं?

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More