बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लस घेतली तर ब्रेकअप करेल’, गर्लफेंडला बाॅयफ्रेंडची अजब धमकी

मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेता लसीकरण हे त्याच्यावर एक संजीवणी म्हणूनच काम करत आहे. मात्र अजूनही लोक लसीकरणाकडे पाठ फिरवताना सर्रास दिसून येतात. अनेकांच्या मनात कोरोना लसीकरणविषयी भीती आहे. अशातच आता एका बाॅयफ्रेंडनं आपल्या गर्लफेंडला लसीकरण करण्यास मनाई केल्याची घटना समोर येत आहे.

‘मिरर यूके’ मधील एका रिपोर्टनुसार, सोशल मीडियावरुन एका मुलीनं तिच्या बाॅयफ्रेंडनं लसीकरण करण्यास मनाई केल्याचा किस्सा शेअर केला. तिनं सांगितलं की, मी आणि माझा बाॅयफ्रेंड गेल्या एक वर्षभरापासून रिलेशनशीपमध्ये आहे. मी कोरोना लसीचा डोस खूप पहिलंच घेतला होता. मला आता लसीचा दुसरा डोस घ्यायचा होता मात्र माझ्या बाॅयफ्रेंडनं लस घेऊ नको सांगितलं.

पुढे ती म्हणाली की, जर मी लस घेतली तर त्यानं माझ्यासोबत ब्रेकअप करण्याची, मला सोडून देण्याची धमकी दिली. पहिल्यांदा मला वाटलं की तो मस्करी करत आहे. मात्र लक्षात आलं की तो याबाबत सीरीअस आहे. अनेकांनी मला माझ्या जीवाचा विचार करण्याचा सल्ला दिला, तर अनेकांनी बाॅयफ्रेंडला समजवून सांग आणि लस घेणं किती महत्वाचं हे पटवून दे असं सागितलं.

दरम्यान, सोशल मीडियावर अनुभव शेअर करताना अनेक नेटकऱ्यांनीही तिला अनेक वेगवेगळे सल्ले दिले. अशातच असे अनेक वेगवेगळे किस्से, अनुभव या कोरोना काळात ऐकायला पाहायला मिळाले.

थोडक्यात बातम्या – 

‘हा पोरखेळ एकदिवस अंगावर उलटेल’; संजय राऊतांचा इशारा

“इम्तियाज जलील यांना निवडून आणण्याच्या पापात आम्ही सुद्धा भागीदार”

…म्हणूून आज मुंबईमध्ये महिलांसाठी होणार विशेष लसीकरण!

“PM मोदी आणि ICMR च्या अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी व्हावी”

भारताचा रेकाॅर्ड! कोरोना लढ्यात बाकीच्या देशांना जमलं नाही ते भारताने करून दाखवलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More