बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी रांगत फिरेन, हवं तर लोळत फिरेन, हवं तर गडगडत जाईन, कोणाला काय प्राॅब्लेम?”

सातारा | राज्याच्या राजकारणात आमदार आणि खासदार यांच्यात नेहमीच वाद-विवाद रंगलेला दिसतो. सातारा नगरपरिषद, आमदार शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले हे सर्व भाजपचे असूनही सतत यांच्यात कलगीतूरा रंगलेला असतो. भाजपचे खासदार उदयनराजे आणि भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आताही सातारा नगरपरिषदे कामावरून एकमेकांसमोर आले आहेत.

सातारा नगरपरिषदेवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आहे. उदयनराजे नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत. परिणामी त्यांच्या शैलीवर आमदार शिवेंद्रराजे सतत टीका करतात. आताही सातारा नगरपरिषदेनं काम केली नाहीत, कामं केली असती तर येवढी पोस्टरबाजी करण्याची गरज तुम्हाला पडली नसती. गाडी चालवण्यापेक्षा नगरपरिषदेची सत्ता नीट चालवली असती तर ही अवस्था झाली नसती, अशी खरमरीत टीका शिवेंद्रराजे यांनी केली होती.

मी दुचाकीवरून फिरेन, चालत फिरेन, मी रांगत फिरेन, हवं तर लोळत फिरेन, हवं तर गडगडत जाईन कोणाला काय प्राॅब्लेम? या भाषेत उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. परिणामी दोन राजेंमधील वाद वाढण्याची चिन्हं आहेत. सातारा नगरपरिषदेतील कामावरून दोन्ही राजे अनेकदा एकमेकांसमोर आले आहेत. आता पुन्हा यांच्यात वाद पेटलेला दिसून येतोय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या समर्थकांमध्ये सशस्त्र वाद झाला होता. परिणामी सातारात काही काळ तणावाचं वातावरण होतं. एकाच पक्षात असूनही दोन्ही राजे एकमेकांवर शाब्दिक हल्ले करत असतात.

थोडक्यात बातम्या 

‘आपण फक्त टगे पोसतोय, हे त्यांना समजलं पाहिजे’; प्रीतम मुंडेंचा घणाघात

‘…तर शिवसेेनेचे आमदार भाजपसोबत गेले असते’; शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

आमदारांची दिवाळी गोड! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दिवाळीनिमित्त BSNLची खास ऑफर! ‘या’ महिन्यात मिळेल फुकट डेटा-काॅलिंग

मंदाकिनी खडसेंना तुर्तास तरी अटक नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More