Top News महाराष्ट्र मुंबई

“मै नंगा आदमी हूँ, माझ्या नादी लागू नका”

नवी दिल्ली | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं नोटीस पाठवली आहे. यावरुन संजय राऊत यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत, भाजपवर निशाणा साधला आहे.

मै नंगा आदमी हूँ, बाळासाहेब ठाकरेंका शिवसैनिक हूँ… मी कुणाला घाबरत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपाला इशारा दिला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, “गेल्या दीड महिन्यांपासून सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) आमच्याकडून माहिती, कागदपत्रं मागितली आहे. आम्ही त्यांना आवश्यक माहिती देत आहोत.”

तसेच, ईडीनं अद्याप तरी त्यांच्या नोटिशीत पीएमसी बँक घोटाळ्याचा उल्लेख केलेला नाही. मग भारतीय जनता पक्षाच्या माकडांना ही माहिती कुठून मिळाली, ते कालपासून उड्या कसे काय मारू लागले?, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

दरम्यान, याआधी संजय राऊत यांनी ट्विटरवरुन ‘आ देखे जरा किसमे कितना है दम…’, असं म्हणत भाजपा नेत्यांना आणि मोदी सरकारला चॅलेंज दिलं होतं.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! शेतकऱ्यांच्या समर्थनात पंजाबच्या वकिलाची आत्महत्या

पंजाबमधील शेतकरी आक्रमक; उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल!

‘…तर हे माझं शेवटचं आंदोलन असेल’; अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला इशारा

अक्षय कुमारने वाढवलं मानधन; एका चित्रपटासाठी घेणार ‘इतके’ रूपये

“मी जर तोंड उघडलं तर केंद्रातल्या सरकारला हादरे बसतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या