बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, न्यायालयानं दिला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा (ST workers) संप सुरू आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोवर संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं, यासाठी सुरू असलेल्या असलेल्या संपाबाबत मुंबई हायकोर्टात आज पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीत महत्त्वाचा निर्णय सांगण्यात आला आहे.

संपकरी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी 15 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावं, त्याप्रमाणे ते कामावर रुजू झाले नाही तर राज्य सरकार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यास मोकळे आहे. मात्र संपकरी कर्मचारी संप मिटवून कामावर रुजू होण्यास तयार असतील तर त्यांना कारवाईच्या भीतीविना रुजू होऊ द्या, असं मुंबई हायकोर्टानं म्हटलं आहे.

दरम्यान, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात असून आता पुढील 10 दिवसांत कामावर हजर न झाल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराविषयी एकनाथ खडसेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले…

“किरीट सोमय्या ही महाराष्ट्राला लागलेली कीड, ही कीड मी संपवणार”

“खोटं बोल पण नेटानं बोल हा संजय राऊत यांचा स्वाभाव”

CNG गाड्या वापरणाऱ्यांना मोठा झटका, ‘ही’ महत्त्वाची बातमी आली समोर

कोरोनाच्या नव्या लक्षणाविषयी WHOचा गंभीर इशारा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More