बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जन्म दिला त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद’; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना सुनावलं

मुंबई | शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाल्यानंतर शिवसेना पक्षाचं अस्तित्व धोक्यात आलं. आताच्या घडीला निम्याहून अधिक शिवसेना आणि त्यांचे आमदार, खासदार शिंदे गटात आहेत. मागील काही दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांची एक सनसनाटी मुलाखत घेतली आणि काही प्रश्नांवर प्रकाश टाकला.

मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजकारणात ज्या आईने जन्म दिला त्याच आईला गिळायला निघालेली ही औलाद आहे. त्यांनी मुख्यमंत्री पदाची हाव सुटली होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बंडखोर आमदारांच्या या राक्षसी महत्वाकांक्षा आहेत. या प्रवृत्तीला हावरटपणा म्हणतात. आणि हावरटपणाला सीमा नसते. यांना मुख्यमंत्रीपद हवं आहे. त्यांना शिवसेनाप्रमुख पद हवं आहे. ते शिवसेनाप्रमुखांसोबत स्वत:ची तुलना करत आहेत. हे लोक राजकारणात त्यांना ज्या आईने जन्म दिला त्याच आईला गिळायला निघालेले आहेत, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीये.

समजा, मी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असतं, तर त्यांनी काय वेगळं केलं असतं? त्यांना आता शिवसेनाप्रमुख होण्याची हाव लागली आहे. तुझे ते ही माझे, माझे ते ही माझे, याचे ते ही माझे आणि त्याचे ते ही माझे अशी ही सगळी वृत्ती आहे. याला हावरटपणा म्हणतात आणि त्याला कोणतीही सीमा नसते, असंही यावेळी मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या – 

राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलैलाच का होतो?, वाचा सविस्तर

अविवाहितेच्या मुलांना फक्त आईचं नावही लावता येणार, ‘या’ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

‘या’ आर्युवेदिक उपायाने झटपट वजन कमी करा, वाचा सविस्तर

कृणाल पांड्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन, बाळाचं नावंही आहे अगदी खास; पाहा फोटो

निता अंबानींकडून नीरज चोप्राचं अभिनंदन, तरीही सोशल मीडियावर झाल्या ट्रोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More